Pune : भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या पुण्यात ‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’स शुभारंभ

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीतर्फे (Pune) रविवारी (दि. 14) सकाळी 7 वा. हर मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र अध्यक्ष भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेश पांडे राहणार आहेत. शिवाजी नगर गावठाण रोकडोबा मंदिर व राम मंदीर येथून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

भाजप नेते आणि हिंदू इकोसिस्टमचे संस्थापक कपिल मिश्रा यांच्या आवाहनानुसार, हिंदू इकोसिस्टमने भारतातील मंदिरांची स्वच्छता करण्याची शपथ घेतली आहे. संस्थेशी निगडीत बांधव जिथे राहतात तिथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या नातेवाईक आणि मित्रांसमवेत जवळच्या मंदिरात जाऊन स्वच्छता करतील, आणि मंदिराची देखभाल करतील, असा ठराव करण्यात आला आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वी दिलेल्या या आवाहनानंतर 400 हून अधिक मंदिरांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Prakash Javadekar: प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा निखळला – प्रकाश जावडेकर

एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नाशिक जिल्ह्यातील श्री काळाराम मंदिरात स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता.  यावेळी त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात याचा उल्लेख केला आणि देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता (Pune) मोहीम राबवण्याचे आवाहन देशवासियांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.