Bhor : शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : भोर (Bhor) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह या शासकीय वसतिगृहासाठी भोर मुख्यालयापासून 3 किमी अंतरामध्ये खाजगी जागा खरेदी करायची असून इच्छूक जमीन मालकांनी 31 जानेवारीपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण संगिता डावखर यांनी केले आहे. 

Pune News : गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी ‘आयवा’च्या 55 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

शासकीय वसतिगृहासाठी कमीत कमी एक एकर ते जास्तीत जास्त दोन एकराच्या मर्यादेत जागा खरेदी करण्यात येणार आहे. इच्छुक जमीन मालकांनी आपल्या वैयक्तिक अथवा संयुक्त मालकीची खाजगी (Bhor) जमीन विकण्यास तयार असल्यास त्यांनी जागेचा सन 1930 ते 2022 पर्यंतचे 7/12 उतारे, सर्व फेरफार, झोन दाखला, मोजणी क प्रत, कलर झोनिंग, भाग नकाशा, गट नकाशा, अॅक्विझेशन, रिक्विझेशन नसल्याबाबत दाखला, वहिवाटीचा रस्ता आदी कागदपत्रे घेऊन सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.105, 104, विश्रांतवाडी रोड, येरवडा स्टेशनसमोर, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.