Bhor : भोर तालुक्यातील स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाचा एल.ई.डी. बल्ब प्रकल्प पथदर्शी – अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार

एमपीसी न्यूज – स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाने राबविलेला एल.ई.डी. बल्ब निर्मिती प्रकल्प पथदर्शी असून येत्या काळात (Bhor) राज्यात एक मोठा उद्योग समूह म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केला.

राज्यातील प्रत्येक गावातील महिलांपर्यंत अशा स्वरूपाचे नावीन्यपूर्ण उपक्रम पोहचवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. भोर तालुक्यात खोपी गावातील स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाच्यावतीने राबविण्यात उपक्रमांना दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, मिलिंद टोणपे, भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय धनवटे, पेसाचे सहसंचालक विक्रांत बगाडे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ आणि महिला बचत गटातील सदस्या उपस्थित होत्या.
ग्रामसंघाने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून कुमार म्हणाले, ग्रामसंघातील गटाच्यावतीने राबविण्यात आलेला एल.ई.डी. बल्ब बनविणे व दुरूस्त करण्याबाबतचा उपक्रम पथदर्शी आहे.

Shivsrushti : आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी समोरील रस्त्याचे काम संथगतीने

या उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातील महिला समूह गटांना उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे सांगत नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. उमेद व एमएसआरएम अभियानाच्यामाध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत महिला समक्षीकरण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुमार म्हणाले.

महिला बचत गट व ग्रामसंघाना सोई-सुविधा पुरविणार –

प्रासाद म्हणाले, शासनाच्या उमेद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून (Bhor) जास्तीत जास्त महिला बचत गटांना लाभ मिळण्यासोबतच जिल्हा परिषद निधीअंतर्गत ग्रामसंघाना त्यांचे व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोई-सूविधा व कायदेशीर मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे.

महिला बचत गटांना जि.प.निधीअंतर्गत निवडक गटातील प्रति बचत गटास प्रायोगिक तत्वावर 2 लाख रूपये अनुदान व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पुरवठा करणेत आलेल्या अर्थसहाय्यातून पुण्यश्री सुपर शॉपींची स्थापना येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात भोर व मावळ तालुक्यात प्रत्येकी 1 किरकोळ विक्रीचे दुकान करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.