Marketyard Crime : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात थरार, फायरिंग करून 28 लाखाची रोकड लुटली

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड (Marketyard Crime) परिसरात आज दुपारच्या सुमारास एक थरारक घटना घडली. दिवसाढवळ्या गोळीबार करत चोरट्यांनी तब्बल 28 लाख रुपयांची रोकड लुटली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. रोकड लुटणाऱ्या या चोरट्यांना पकडण्याचे मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार व्यक्ती हे मार्केट या परिसरात असलेल्या पी एम आंगडिया या कार्यालयात आले. प्राथमिक माहितीनुसार हे कार्यालय एका कुरिअर कंपनीचा आहे. दरम्यान, तक्रारदार व्यक्तीने पैसे तपासून पाहिले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा आरोपी या कार्यालयात शिरले. त्यानंतर त्यांनी पिस्तूल दाखवत कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार केला. ही काच फोडून त्यांनी तब्बल 28 लाख रुपयांची रोकड चोरून गेली.

Bhor : भोर तालुक्यातील स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाचा एल.ई.डी. बल्ब प्रकल्प पथदर्शी – अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड (Marketyard Crime) पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, दिवसाढवळा घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.