Kartiki Yatra : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कार्तिकी यात्रेचे नियोजन

एमपीसी न्यूज : पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली (Kartiki Yatra) श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आगामी कार्तिकी यात्रेच्या नियोजना संदर्भात शुक्रवारी झालेल्या सभेत देवस्थान स्थान कमिटीच्या वतीने यात्रेच्या तयारीचा आढावा देण्यात आला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या 8 दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे. दिनांक 14 नोव्हेंबर म्हणजेच कार्तिकी वद्य षष्ठी पासून वारकरी येण्यास सुरुवात होईल. तर 16 नोव्हेंबर रोजी श्री संत नामदेवरायांच्या पालखी सोहळा आळंदीमध्ये दाखल होईल.

कोरोना निर्बंधमुक्त पहिलीच वारी असल्याने या वर्षी 10 ते 12 लाख वारकरी, भाविक यात्रा काळात आळंदीत येण्याची शक्यता आहे. 20 नोव्हेंबर रोजी कार्तिकी वद्य एकादशी मुख्य पूजा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटपूजेसाठी निमंत्रितांना 19 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता हनुमान दरवाज्यातून मंदिरात प्रवेश देण्यात येईल. तसेच 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 ते 3 व दुपारी 2 ते 6 या वेळेत पास धारकांना हरिहरेंद्र स्वामी मठाजवळील जिन्यावरुन मंदिरात प्रवेश देण्यात येईल.

22 नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. विशेष निमंत्रित पासधारक व पारंपरिक मानाच्या सेवांसाठी पासधारकांना हरिहरेंद्र मठाजवळील बारीतून मंदिरात प्रवेश दिला जातो. यावेळी सदर प्रवेशद्वारावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी असावेत. सदर भाविकांना मंदिर प्रवेशासाठी संस्थानचे मानकरी अथवा संस्थानचे सेवक या ठिकाणावरील पोलीस कर्मचारी यांच्याशी संपर्क करतील.

Marketyard Crime : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात थरार, फायरिंग करून 28 लाखाची रोकड लुटली

प्रतिवर्षी इंद्रायणी नदी पलीकडील वैतागेश्वर मंदिरामागील दर्शन मंडपासाठी आरक्षित जागेत दर्शन मंडप उभारून भाविकांच्या दर्शनबारीची व्यवस्था करण्यात येत होती. या वर्षाकरिता दर्शन मंडपासाठी जागा उपलब्ध करून मिळावी. सदर दर्शन रांग मंडपापासून नवीन पुलाचे रस्त्याने एस. टी. स्टँडपर्यंत तेथून जुन्या पुलावरून आळंदी शहराकडे वळवण्यात येते. दर्शन मंडपातील भाविक भक्तीसोपान पुलावरून नवीन दर्शन बारी इमारत /पान दरवाजा मार्गाने (आळीपाळीने किंवा भाविकांच्या गर्दीनुसार) मंदिरात प्रवेश (Kartiki Yatra) करतील. इंद्रायणी तीरावर दत्तघाटावर महापूजा पासधारकांसाठी मंडप उभारण्यात येणार आहे. सदर पुजाधारक पहाटे पासून ते सकाळी 11 पर्यंत पाणदरवाजा मधून मंदिरात प्रवेश करतील.

महाद्वारात बॅरिकेटस लावून बंद करण्यात येईल. भाविक महाद्वारातून बाहेर पडतील. या ठिकाणीही स्थानिक पोलीस कर्मचारी नियुक्त असावा. मंदिर, दर्शनबारी मंडप इत्यादी ठिकाणी लाईट गेल्यास तात्काळ जनरेटरद्वारे विद्युत व्यवस्था करण्यात येईल. भाविकांना पिण्याचे पाणी मंदिर, दर्शन मंडपात उपलब्ध करून देण्यात येईल. दर्शनबारीत व मंदिरात स्वयंसेवी संस्था व ग्रामीण रुग्णालय ,आळंदी यांच्या मदतीने आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात.

भाविकांना एलईडी स्क्रीनद्वारे दर्शनमंडपात दोन ठिकाणी (Kartiki Yatra) श्रींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. संस्थान कमिटीने मंदिर परिसर, दर्शनमंडप या ठिकाणी कायमस्वरूपी सी .सी. टी .व्ही. कॅमेरे बसविले आहेत. यात्रा काळात इंद्रायणी पलीकडील दर्शनमंडपात ही कॅमेरे बसविण्यात येतील. मंदिरासाठी प्रतिवर्षा प्रमाणे पोलिस बंदोबस्त मिळावा. संस्थान मार्फत आळंदी शहरात 100 शौचालये यात्रा कालावधीसाठी बसविण्यात येणार आहे. त्याकरिता जागा व पाणी नगर परिषद उपलब्ध करून देते. ज्या दिंड्यांची, वारकऱ्यांची आळंदी शहरात राहण्याची गैरसोय होत आहे. अशा दिंड्या व वारकऱ्यांकरिता देवस्थानने 435 एकर जागेत उतरण्याची व्यवस्था करता येईल. त्याठिकाणी आपण प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, शौचालये, लाईट व्यवस्था व्हावी. याबाबतची माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.