Marketyard : वकिलाने केला पोलिसांवर हल्ला; वकिलाला अटक

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये वकिलानेच पोलिसांवर हात (Marketyard) उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चक्क एका वकिलाने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना मार्केटयार्ड येथे घडली. इतकेच नव्हे तर मुठीतल्या चावीने पोलिसांनी मारल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलीस जखमी झाले असून प्रतीक अंकुश तावरे या वकिलाने ही मारहाण केली आहे.

Talegaon Dabhade : सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

मार्केटयार्डमध्ये बुराणी कॉलनीत झालेली भांडणे सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक मदन कांबळे गेले होते. यावेळी प्रतीक तावरे हा हर्षल लाहोटे या शेजाऱ्याला शिवीगाळ करत होता. त्या भांडणामध्ये मदन कांबळे समजावत असताना प्रतीक याने कांबळे यांच्यावर हल्ला केला. कांबळे यांच्या फिर्यादीवरून प्रतीक याला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.