Marketyard Crime : व्हाट्सअप स्टेटसवरून एकावर कोयत्याने वार; पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील प्रकार

एमपीसी न्यूज : एका मित्राने (Marketyard Crime) दुसऱ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त व्हाट्सअपला स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगरमध्ये हा सर्व प्रकार घडला. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी या आंबेडकरनगराचा भाई आहे, अशा धमक्या देत परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फहिम फिरोज शेख (वय 18, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ अशोक सदाफुले (वय 22) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांचा मित्र काळु घोलप याच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते. त्याचा राग आल्याने फहिम याने त्यांना अडवत त्यांच्यावर हल्ला केला. पण, तो वार चुकवून तक्रारदार पळाले असता त्यांच्या पायावर कोयत्याने वार केला. त्यावेळी ते खाली कोसळले. त्यानंतर रिक्षातून खाली उतरून कोयता हवेत फिरवून दहशत माजविली. तसेच, जमलेल्या नागरिकांना देखील धमकावत गोंधळ घालून तुफान राडा घातला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Baramati : जाधव-भोसले टोळीची बारामतीत दहशत; जेवनाचे पैसे मागणाऱ्या हॉटेलची तोडफोड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.