Marketyard : मार्केटयार्ड परिसरात अल्पवयीन तरुणांचा धुडगूस; कोयते तलवारी नाचवत गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज : मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील (Marketyard) आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 16 मध्ये पाच ते सहा जणांच्या अल्पवयीन टोळक्याने मध्यरात्री धुमाकूळ घातला. या टोळक्याने हातात कोयते घेऊन दहशत माजवत लोकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. इतकच नाही तर दुचाकीची तोडफोड देखील केली. याप्रकरणी इस्माईल अयाज शेख यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अंदाजे 17 वर्ष वयाचे पाच ते सहा मुले आंबेडकर नगर परिसरातील गल्ली नंबर 16 मध्ये आले.

त्यांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन लोकांना दुकान बंद (Marketyard)करण्याची धमकी दिली. लोकांच्या गाड्यावर कोयत्याने आणि तलवारीने वार करून सात मोटारसायकल यांची तोडफोड केली. त्यानंतर सर्व आरोपी हातात कोयते आणि तलवारी नाचवत त्या ठिकाणाहून निघून गेले. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Maharashtra : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 189 कैद्यांची कारागृहतून सुटका होणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.