Baramati : जाधव-भोसले टोळीची बारामतीत दहशत; जेवणाचे पैसे मागणाऱ्या हॉटेलची तोडफोड

एमपीसी न्यूज : बारामती एमआयडीसीत (Baramati) सात जणांच्या टोळीने 17 डिसेंबर रोजी धुडगूस घातला. एका हॉटेलमध्ये मध्य प्राशन करून जेवण केल्यानंतर बिल मागणाऱ्या हॉटेल मालकावर प्राणघात हल्ला करण्यात आला. बारामती तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मॅनेजर नौशाद युनूस शेख (वय 29) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

आरोपी अनिल सुरेश जाधव, पियुष मंगेश भोसले, चेतन कांबळे, शामू वेल जाधव, यश मोहिते, प्रथमेश मोरे आणि विशाल माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बारामती एमआयडीसीतील पियाजो कंपनी समोर कोमल स्नॅक्स अँड बार हॉटेल आहे. 17 डिसेंबरच्या दिवशी आरोपी या हॉटेलमध्ये बियर पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी बसले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी बिलाचे पैसे मागितले असता आरोपींनी दहशत माजवली. आम्ही बारामतीचे भाई आहोत तू आम्हाला बिल मागतोस काय असे म्हणून हॉटेलमधील साहित्याची कोणत्याही तोडफोड केली. हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना बिअरची बाटली फेकून मारली. इतकेच नाही तर जाताना दारूच्या चार बॉटल जबरदस्तीने घेऊन गेले आहेत. पार्किंगमध्ये ग्राहकांच्या दुचाकी वाहनांचेही त्यांनी जबर नुकसान केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

PMC : पुणे महानगरपालिका मोठ्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल कधी करणार?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.