PMC : पुणे महानगरपालिका मोठ्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल कधी करणार?

एमपीसी न्यूज : सजग नागरिक मंच (SNM) या संस्थेने पुणे महानगरपालिका (PMC) प्रशासनावर 1 कोटींहून अधिक वार्षिक मालमत्ता असलेल्या 1,065 मालकांकडून 3,330 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘अतिरिक्त प्रयत्न केले नाहीत’ अशी टीका केली आहे. 

त्यात दावा करण्यात आला आहे की, पीएमसी मात्र 40 टक्के सवलत काढून आणि दरवर्षी कर दर वाढवून नियमित करदात्यांवर भार टाकत आहे. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कर असलेल्यांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीचा तपशील मंचाने मिळवला आहे. त्यात संकलित केलेली माहिती धक्कादायक होती.

संकलित केलेल्या माहितीनुसार, 1,065 करदात्यांची एकूण 3,330 कोटी रुपये थकबाकी (PMC)आहे, तर 71 करदात्यांची एकूण 737 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यावर कोर्टात आक्षेप नोंदवले आहेत. या लोकांमध्ये, दोन प्रकरणांमध्ये एकूण 432 कोटी रुपयांची देणी आहे. SNM चे विवेक वेलणकर म्हणाले, की मोबाइल टॉवरची एकूण 1,419 कोटी रुपयांची थकबाकी असलेली 660 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

नागरी कायदेशीर आणि मालमत्ता कर विभागांना ही प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्यासाठी एक समर्पित सेल स्थापन करण्यास सांगितले आहे. जरी निम्मी प्रकरणे पीएमसीच्या बाजूने असती, तरी नागरी संस्थेला 1,000 कोटी रुपयांची वसुली झाली असती. पीएमसीने म्हटले आहे, की 352 कोटी रुपयांची 105 प्रकरणे रेकॉर्ड बुकमध्ये दुहेरी नोंदीच्या तक्रारींवरील आहेत. वेलणकर म्हणाले की, नागरी प्रशासनाने याची पडताळणी करून तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक आहे.

Pune News : मानाच्या पहिल्या आंब्याची पेटी मार्केटयार्डात! एका पेटीची किंमत तब्बल 41 हजार रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.