Talegaon Dabhade : सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज : सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या (Talegaon Dabhade) मंदिरमध्ये शुक्रवार 30 डिसेंबर 2022 रोजी स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.

बालवाडी ते दहावी असे अत्यंत आनंदात साजरे झाले. दोन सत्रात साजरे झालेले हे स्नेहसंमेलन बालवाडी व माध्यमिक सकाळच्या सत्रात व इ. पहिली ते सातवी प्राथमिक विभागाचे दुसऱ्या सत्रात साजरे झाले. सकाळच्या सत्रात विजयकुमार सरनाईक ( मुख्याधिकारी त .दा. न.प.) , विवेक  इनामदार (वरिष्ठ पत्रकार एमपीसी न्यूज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते.

तर, दुपारच्या सत्रात शिल्पा रोडगे (प्रशासन अधिकारी त.दा.न.प.) व विलास भेगडे (पत्रकार दैनिक लोकमत) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Maharashtra : …आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दोन्ही सत्राचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.  ईशस्तवन व स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. अहवाल वाचन बालवाडी प्रमुख सोनाली काशिद ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले.

प्रथम सत्रात प्रास्ताविक शिक्षण समिती सदस्या डॉ. ज्योती चोळकर यांनी तर द्वितीय सत्रात  संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांनी केले. पाहुण्यांची ओळख सुनिता कुलकर्णी व पूजा उतेकर यांनी केली.

संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड सर यांच्या हस्ते विजयकुमार सरनाईक यांचा , तर विवेक इनामदार यांचा सत्कार सुनिल आगळे यांनी केला. तर द्वितीय सत्रात शिल्पा रोडगे यांचा  सत्कार  संस्थेच्या खजिनदार सुचित्रा चौधरी व  विलास भेगडे  यांचा सत्कार संस्थेचे सदस्य सुनिल आगळे यांनी केला. तसेच, हस्तलिखित मासिकाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पारितोषिक वितरणाचे वाचन प्रथम सत्रात सुरेखा रासकर व द्वितीय सत्रात सोनल शेटे यांनी केले. प्रमुख मान्यवर विवेक इनामदार यांनी शाळेविषयीच्या असलेला अभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केल. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सांगितले तसेच विजयकुमार सरनाईक यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरणाचे संवर्धन करावे असे संदेश दिला. द्वितीय सत्रातील प्रमुख मान्यवर शिल्पा रोडगे व विलास भेगडे यांनी मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी कमी करावा, पालकांनी विद्यार्थ्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. गुरुजनांचा, आई-वडिलांचा आदर करावा. हे संस्कार विद्यार्थ्यांवर आजच्या पिढीमध्ये केले गेले पाहिजे असे  आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.

Maharashtra : …आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त बालवाडी विभागाने देशभक्तीपर, प्राथमिक विभागाने स्वातंत्र्यपूर्व व माध्यमिक विभागाने स्वातंत्र्योत्तर भारत या  विषयावर सादरीकरण  केले.  या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, खजिनदार सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती सदस्या डॉ. ज्योती चोळकर ,सदस्य सुनिल आगळे, विश्वास देशपांडे तसेच इंदोरीच्या बालवाडी विभाग प्रमुख अनुराधा बेळणेकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका नीता दहितुले हे सर्वजण उपस्थित होते तसेच सर्व  पत्रकार,  पोलीस, सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाच्या सुनिता कुलकर्णी तर प्राथमिक विभागाचे सूत्रसंचालन पूजा उत्तेकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन माध्यमिक  विभागात छाया सांगळे तर  प्राथमिक विभागात तृप्ती भास्कर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  अनमोल सहकार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.