Shivsrushti : आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी समोरील रस्त्याचे काम संथगतीने

एमपीसी न्यूज – नवले ब्रिज ते कात्रज चौकाकडे जाणारा रस्ता व आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी समोरील नव्या रस्त्याचे अनेक वर्षांपासून काम चालू (Shivsrushti) आहे. पण हे काम कितपत मजबूत आहे? हा प्रश्न आम्हा नागरिकांना पडला आहे. अजून वर्ष पण नाही उलटलं तरी या स्लॅबला तडा पडला. पुढील काळात जर काही अनुचित प्रकार घडला, तर कोण जबाबदार?

अनेक वर्षे झाले रस्त्याचे काम हे संथ गतीने चालू असून जलद गतीने होताना दिसत नाही. अनेक वर्षे रस्त्याची डागडुजी नाही व रोज अपघात होतात. काही मृत्युमुखी पावतात. खड्ड्याचे साम्राज्य रस्त्यावर आहे. ते बुजवायचे प्रशासन नाव घेत नाही, भटक्या कुत्र्यांचा देखील मोठ्या प्रमाणात असणारा या परिसरात वावर आणि खड्डे यामुळे अपघात होत आहे. आणि हे सर्व ठाऊक असून प्रशासन लवकरात लवकर काम पूर्ण करत नाही.

Hemant Patil : इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्या चित्रपटाला विरोध योग्यच – हेमंत पाटील

आज या क्षणाला तर हे नवीनच पहायला मिळत आहे. इतके (Shivsrushti) वर्षे झालं काम चालू असून सुद्धा व्यवस्थित नियोजन आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे आशिष भोसले यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.