Pune : आंबेगाव बुद्रुक येथील रस्त्यावर खर्च कशासाठी? आशिष भोसले यांचा सवाल

एमपीसी न्यूज – आंबेगाव बुद्रुक (Pune) येथील भुयारी मार्गाला लागून कात्रज ते नवले ब्रिज या महामार्गाला जोडणार असा प्रकल्प आहे. या रस्त्यावर खड्डे भिंतीवर ऐतिहासिक वास्तूचे चित्रभित्तीवर प्रशासन खर्च कोणत्या कारणासाठी करते, यावर आक्षेप असल्याचे स्वराज्य संघटनेचे सदस्य आशिष भोसले यांनी म्हटले आहे.

या ठिकाणी मद्यप्राशकांचा वावर आहे. ऐतिहासिक वास्तूचे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का? गेले अनेक वर्षे बायपास रस्त्याचे काम मंदगतीने चालू आहे. या भागात पिण्याचे पाणी अजून पोहचले नाही. दुप्पट तिप्पट टॅक्स असून देखील प्रशासन जाणूनबुजून हे करत आहे. भित्तिचित्रे लावून काय साध्य होणार, अनेक वर्षे मंदगतीने काम सुरू असून भुयारी मार्ग ते सिंहगड कॉलेज पर्यंत ट्राफिक रोज सातत्याने होत आहे.

नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रोज सातत्याने असे अपघाताचे सत्र चालू असून प्रशासनाने यावर तोडगा काढून हा मार्ग नागरिकांसाठी चालू करावा, सुस्वच्छ आणि योग्य रस्ते, या सर्व सुविधांसाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करत आहोत. खरं तर या ठिकाणी तात्काळ बाणेर, पाषाण, वारजे – माळवाडी सारखा प्रशस्त मोठा भुयारी मार्ग अपेक्षित आहे.

पुणे महानगरपालिका, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे वाहतूक विभाग,राज्य महामार्ग विभाग आणि राष्टीय महामार्ग विभाग आणि PMRDA आयुक्त यांनी विशेष लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. कारण जवळच असलेल्या महाराष्टातील “शिवसृष्टी” या भव्य दालनाचे काम पूर्णत्वास येत असून त्या नंतर अधिकच वाहतूक परिस्तिथी गंभीर होऊ शकते. याची सरकारी यंत्रणा यांनी या (Pune) गंभीर वाहतुक कोंडीची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला ठिय्या आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा आशिष भोसले यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.