Talegaon : तळेगाव येथे श्री शांतीनाथ, श्री आदिनाथ मुर्तीपूजक जैन संघातर्फे सामुदायीक “छ:” पालीत संघ संपन्न

एमपीसी न्यूज – श्री शांतीनाथ, श्री आदिनाथ सकल जैन संघ द्वारा (Talegaon)सामुहिक लाभार्थी परिवार तर्फे पहिल्यांदा “छः” री पालीत संघ तळेगाव स्टेशन ते पाबळ तिर्थ येथे झाला.

या कार्यक्रमाच्या दींडी यात्रेचा पहिला मुक्काम तळेगाव ते भंडारा लॉन्स , दुसरा मुकाम भंडारा ते महाळुगा , तिसरा मुक्काम महाळुगाते खेड , चौथा मुक्काम खेड ते गोसासी, पाचवा व अंतिम गोसासी ते पाबळ जैन तिर्थ येथे होता.

येथे संपुर्ण ट्रस्ट मंडळाचे ट्रस्टीगण स्वागतासाठी हजर होते. (Talegaon)यात्रेचे सर्व जण वाजत-गाजत पाबळ मंदिरात दर्शन घेऊन व बाकीची व्यवस्था धर्मशाळेत महाप्रसादाचा आस्वाद सर्व जणांनी घेऊन सामुहिक लाभार्थी परिवारांना संघवी बनण्याची माळ अर्पण केली.

Pune : आंबेगाव बुद्रुक येथील रस्त्यावर खर्च कशासाठी? आशिष भोसले यांचा सवाल

संघवी ही पदवी बहाल करण्याकरिता मुनि हिरसागरजी म.सा, बाल मुनि विरभद्रसागरजी म.सा., साध्वी नमिवर्षोश्रीजी, नेहावर्षोश्रीजी, नितवर्षोश्रीजी, भक्तिवर्षीश्रीजी, हिववर्षोश्रीजी म.सा. यांच्या सानिध्यात देण्यात आली.

 

यानंतर भव्य मणीभद्र पूजन करण्यात आले. हे नियोजन करण्याकरिता श्री तळेगाव स्टेशन जैन सकल संघ, श्री नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभशांती विहार सेवा ग्रुप व जैन महिला मंडळे उपस्थित होते.

तसेच रोज सकाळी (पाचही दिवस) पहाटे 4.30 वा. राइय प्रतिक्रमण, पहाटे 5.30 वा. सामुदायिक चैत्यवंदन व भक्तांबर पाठन,स 6.00 वा. चालत संघ प्रयाण, स 9.30 ते 11.00 स्नातंत्र पूजा व जिनपुजा, 12.00 दुपारी महाप्रसाद, दुपारी 3 ते 4.30 प्रवचन, सायं 6.15 भक्ती संगीत व सामुहिक आरती, 7.30 देवसीय प्रतिक्रमण, रात्री 8… संथारा अशा प्रकारे “छः” पालीत चालत संघ (दींडी यात्रा) संपन्न झाला. अशी माहिती श्री शांतीनाथ-आदिनाथ जैन मंदिर तळेगाव स्टेशन तर्फे देण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.