Mumbai Police : मुंबईतील एकूण 28 पोलिसांच्या बदलीचे आदेश; तर काहींवर नव्या सरकारची कृपादृष्टी

एमपीसी न्यूज : बृहन्मुंबई उपनगरीय पोलिस अधिक्षक (Mumbai Police) तसेच पोलिस उपायुक्त स्तरावरील एकूण 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हा आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.

यामधील काही अधिकारी ही नियु्क्तीच्या प्रतिक्षेत होते, त्यांना आता नव्या ठिकाणी हजर होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मविआ सरकारच्या काळात ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होते त्यांनाही नव्या नियुक्तीचे आदेश देण्यात येण्याने खळबळ उडाली आहे.

Pay Property Tax : मोबाईल ‘लिंक’द्वारे करा मालमत्ता कराचा भरणा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत गुन्हा दाखल (Mumbai Police) असलेले पोलिस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर फोन टॅपिंग प्रकरणात समोर आलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावरही शिंदे – फडणवीस सरकारने कृपा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचेही म्हंटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.