Pay Property Tax : मोबाईल ‘लिंक’द्वारे करा मालमत्ता कराचा भरणा

एमपीसी न्यूज – घरबसल्या ऑनलाइन मालमत्ताकर (Pay Property Tax) भरता यावा, यासाठी महापालिका करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘कस्टमाईज पेमेंट लिंक’ पाठवित आहे. त्यावर ‘क्लिक’ केल्यानंतर बिल उघडते. त्यानंतर कर भरता येतो. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ताकराच्या बिलाशी मोबाईल क्रमांक आणि ई – मेल आयडी जोडावा, असे आवाहन सहाय्यक  आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

PTB-Free India campaign : शहरात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानाची सुरुवात

शहरातील 3 लाख निवासी मालमत्तांधारकांकडे 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. पाच वर्षांपेक्षा (Pay Property Tax) अधिक काळापासून थकबाकीदार असलेल्या नागरिकांवर जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे. 50 हजारांवर थकबाकी असलेले 26 हजार 760 पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले एक हजार 361 व्यावसायिक व मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या तीन हजार 850 अशा 31 हजार 917 मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीस कर आकारणी व कर संकलन विभागाने पाठविल्या आहेत. एक लाखांवर थकबाकी असलेल्या 200 मालमत्ता सील केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.