PTB-Free India campaign : शहरात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानाची सुरुवात

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री टीबीमुक्त आरोग्य अभियानाला (TB-free India campaign) वैद्यकीय विभागाच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत आयुक्त शेखर सिंह, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रत्येकी 2 क्षयरुग्णांना (टी. बी.) पोषण आहार देऊन निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली आहे.

Mahavitaran : महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ द्वितीय नांदेड परिमंडलाचे ‘नजरकैद’ प्रथम

केंद्र शासनाने क्षय रुग्णांसाठी पोषणासाठी (कोरडे शिधा) दिलेल्या मार्गदर्शक (TB-free India campaign) सुचनेनुसार प्रति क्षयरुग्ण, प्रतिमहा 700 ते 800 रुपये खर्च येतो. पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील विविध सेवाभावी संस्था, औद्योगिक संस्था, सहकारी संस्था, राजकिय पक्ष, निवडून आलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य व्यक्तीही निक्षय मित्र होऊ शकतात व क्षयरुग्णांना मदत करु शकतात, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. टीबी मुक्त करण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांना क्षयरुग्ण दत्तक घेऊन. निक्षय मित्र होण्यासाठी आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.