PCMC : छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वासाठी सूचना पाठवा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (PCMC)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी शहरातील नागरिक आणि विविध संघटनांनी कार्यक्रम आयोजनासंदर्भातील सूचना लेखी स्वरूपात पिंपरी येथील महापालिका मुख्यालयातील माहिती व जनसंपर्क विभागात प्रत्यक्ष सादर कराव्यात अथवा [email protected] या मेलवर दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्यात असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. (PCMC)

गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वानिमित्त शहरातील विविध ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संघटना आणि संस्था आदींकडून प्रबोधन पर्वानिमित्त सूचना मागविण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.