Pimple Gurav : उद्यानात जाळला जातोय पालापाचोळा, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimple Gurav) पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात कचरा जाळण्यासाठी एक हौद निर्माण केला आहे. यामध्ये पालापाचोळा जाळत हवा प्रदूषण केले जाते. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपळे गुरव येथे महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात सकाळी नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येतात. उद्यानात शुद्ध हवा मिळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, उद्यानाच्या एका भागात पालापाचोळा साठवण्यासाठी हौद केला आहे. उद्यानात पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविता, नैसर्गिकरीत्या या कचऱ्याचे विघटन झाले पाहिजेत. परंतु, हा कचरा सर्रास जाळला जातो.

PCMC : छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वासाठी सूचना पाठवा, महापालिकेचे आवाहन

दररोज जास्त प्रमाणात कचरा जाळला जात असल्याने, या भट्टीतून धूर हवेत पसरतो. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना तसेच, आजूबाजूच्या सोसाट्यामधील रहिवाशांना या (Pimple Gurav) प्रदूषणाचा अतिशय त्रास होत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.