Pimpri : कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज : कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करत तरुणाला लुटण्याची घटना (Pimpri) पिंपरी येथे घडली. तसेच हवेत कोयते फिरवून दहशत पसरवण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.31) येथे घडली.

हिरालाल श्रीमिसरी मंडल (वय 32 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून लहुया बहोत (रा. पिंपरी), राहुल्या लखन (रा.पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Gurav : उद्यानात जाळला जातोय पालापाचोळा, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेहमी प्रमाणे त्यांच्या हमालीचे काम (Pimpri) करत असताना आरोपी तिथे आले व त्यांनी शिवीगाळ कऱण्यात सुरुवात केली. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या खिशातून 950 रुपये काढून घेतले. तसेच कोयता दाखवून कोणाला काही सांगितले तर याद राख अशी धमकी दिली. यावेळी लोक जमा झाले असता आरोपींनी हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.