Pune : उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार

एमपीसी न्यूज – महापालिकेतील कर्मचारी त्यांच्या उत्तम सेवेचे  (Pune) योगदान कार्यालयीन कामकाजात देत आहेत, या  कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

महानगरपालिकेतील वाहनचालक बालाजी अय्यंगार यांचा 23 वर्षीय मुलगा प्रणव अय्यंगार यांची नुकतीच भारतीय नौदल सेनेत सब लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली. तमिळनाडू येथे जन्मलेल्या सब लेफ्टनंट प्रणव अय्यंगार यांची आधीपासूनच सैन्यदलात काम करण्याची इच्छा होती. 25 नोव्हेंबर 2023 रोजी नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांच्या उपस्थितीत प्रणव अय्यंगार यांना सब लेफ्टनंट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रणव यांनी नौदल प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली.

Pimpri : क्रीडा प्रबोधिनीला दुहेरी मुकुटाची संधी; पुरुष गटात जीएसटी व क्रीडा प्रबोधिनी अंतिम फेरीत

तर मुख्य लेक्षा परिक्षण विभागातील आत्माराम माने यांचा मुलगा अभिषेक माने यांनी दक्षिण अमेरिकेतील इलो, पेरू येथे झालेल्या मिस्टर प्लॅनेट युनिव्हर्स 2023 या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विविध देशातील 15 स्पर्धकांमधून द्वितीय उपविजेतेपद मिळवून जागतिक मंचावर पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावले. यासोबतच त्यांनी मिस्टर प्लॅनेट कॉपर वर्ल्ड हा खिताबही जिंकला. याआधी  मिस्टर प्लॅनेट युनिव्हर्स 2023 उपांत्य फेरीदरम्यान मिस्टर प्लॅनेट एशिया 2023 चे विजेतेपदही त्यांनी पटकावले होते.

मुख्य लेखा परिक्षण विभागातील उपलेखापाल दिप्ती हांडे यांचा मुलगा यशराज (Pune) हांडे याने 17 वर्षीय जिल्हास्तरीय ओपन साईट एयर रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधताना यशराजने लहानपणापासूनच नेमबाजीचे आवड असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय नेमबाज होण्याची इच्छा व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.