Pune : रस्सीखेच व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज – अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रस्सीखेच व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए. इनामदार यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहसचिव मीनाक्षी राऊत, प्राचार्य राज मुजावर, पर्यवेक्षिका फरजाना मुजावर, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या रोशन आरा शेख आदी उपस्थित होते.

Pune : उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार

 

यावेळी बोलताना मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे व अभ्यासाचे महत्व (Pune) समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सना शेख व जुवेरीया इनामदार यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्या परवीन शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मजिद सर, खालिद सर, अमजद सर, जावेद सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.