Pune : जंगली महाराज रस्त्यावर महापालिका प्रशासन करणार कोट्यवधी रुपयांची उधळण

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सुस्थितीत असलेल्या आणि गेल्या (Pune)काही वर्षांपूर्वीच पुनर्रचना केलेल्या जंगलीमहाराज रस्त्याच्या दुरुस्तीचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. या रस्त्यावर एक खड्डाही नसताना दुरुस्तीसाठी दोन कोटींचा खर्च केला जाणार आहे.

त्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे (Pune)मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जंगलीमहाराज रस्त्यावरील दोन कोटींची ही उधळपट्टी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. पुण्यातील आदर्श रस्ता म्हणून जंगली महाराज रस्त्याची ओळख आहे.

Pune : महावितरणचे खराडी उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद; मात्र वीज पुरवठ्यावर परिणाम नाही

सध्या हा रस्ता एकेरी आहे. या रस्त्याच्या कडेला काही किरकोळ व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावर एकही खड्डा नसताना कोट्यवधी रुपयांची उधळण कशासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यावरील गरवारे चौक ते सुभाषचंद्र बोस चौक या दरम्यानच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविली आहे. यासाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचे पूर्वगणन पत्रक तयार करण्यात आले. या कामासाठी सात निविदा आल्या.

त्यांपैकी तीन पात्र ठरल्या. निविदेपेक्षा 11 टक्के दराची निविदा अर्थात सुमारे दोन कोटी पाच लाख रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. रस्ता खड्डेमुक्त असताना आणि पदपथही नव्याने प्रशस्त केले असताना या रस्त्याची नेमकी कोणत्या प्रकारची दुरुस्ती होणार याबाबत मात्र विचारणा सुरू झाली आहे. दरम्यान, यापूर्वीच्या ठेकेदाराची कामाची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने निविदा काढण्यात आली आहे.

जंगलीमहाराज रस्त्यावरील शोभेच्या झाडांची देखभाल, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, जलवाहिनीच्या कामांमुळे झालेल्या भागाची दुरुस्ती याअंतर्गत केली जाणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निविदा आहे, असे पथ विभागाकडून सांगण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.