Pimpri : क्रीडा प्रबोधिनीला दुहेरी मुकुटाची संधी; पुरुष गटात जीएसटी व क्रीडा प्रबोधिनी अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज : क्रीडा प्रबोधिनी संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटात (Pimpri) अंतिम फेरीत प्रवेश केला आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवण्याच्या संधीकडे वाटचाल केली. पुरुष गटात त्यांची जीएसटी कस्टम संघाशी लढत होणार असून महिला गटात त्यांच्यापुढे पीसीएमसी अकादमीचे आव्हान आहे.

ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केली आहे.

पहिल्या उपांत्य फेरीत जीएसटी कस्टम्स पुणे संघाने पीसीएमसी अकादमीचा 4-2 असा पराभव केला. गोल करून करण्याच्या कौशल्यामध्ये उत्कृष्ट सांघिक खेळ करीत जीएसटी संघाने हा सामना जिंकला. स्टिफन स्वामी (7वे) याने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत संघाचे खाते उघडले. बी. फेलिक्स (36वे) याने जीएसटी संघाकडून पूर्वार्धात गोल केला. पीसीएमसी अकादमीसाठी भरत भारद्वाज (30वे) आणि हर्षदीप सिंग (32वे) यांनी पेनल्टी-स्ट्रोकचे गोलात यशस्वी रूपांतर करून 2-2 अशी बरोबरी साधली.

तथापि, जीएसटी संघाच्या प्रणव माने (45वे) याने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत संघास पुन्हा आघाडी मिळवून दिली. नंतर तालेब शाह (56वे) याने गोल करीत संघाची बाजू बळकट केली.

दुसऱ्या उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनीने मध्य रेल्वे पुणे विरुद्ध 4-3 असा रोमहर्षक विजय मिळवला. धैर्यशील जाधव (19वे, 44वे) आणि सचिन कोळेकर (21वे) पेनल्टी कॉर्नर आणि प्रज्वल मोहरकर (46वे) यांनी गोल करीत क्रीडा प्रबोधिनीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मध्य रेल्वे पुणे संघांकडून ए.सद्दाम (3रे, 13वे) आणि विशाल पिल्ले (49वे) गोल करीत उल्लेखनीय लढत दिली.

Pune : नांदेड सिटी येथील सदनिका धारकांवर केलेली बेकायदा कर आकारणी रद्द करा; माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महिला विभागात क्रीडा प्रबोधिनीचा अंतिम सामना पीसीएमसी अकादमीशी होणार आहे. उपांत्य फेरीतील एकतर्फी लढतीत क्रीडा प्रबोधिनीने मुंबई रिपब्लिकन्सचा 3-0 असा पराभव केला. तनुश्री कडू (6वे) हिने स्कोअरिंगला सुरुवात केली, त्यानंतर दीक्षा पाटीलने (51वे) आणि माही चौधरी (53वे) यांनी गोल करीत संघास सहज विजय मिळवून दिला.

(Pimpri) नंतर, पीसीएमसी अकादमीने यजमान एक्सलन्स हॉकी अकादमीवर 4-1 अशी मात केली. त्यावेळी त्यांच्याकडून प्राजक्ता माने (6वे), भावना खाडे (28वे) हिने पेनल्टी कॉर्नरवर, शालानी साकुरे (50वे) हिने पेनल्टी स्ट्रोकवर आणि सानिका माने (54वे) हिने फील्ड गोल केला. नेहा खैराळे (36वे) हिने पराभूत संघाकडून एक गोल केला.

निकाल

पुरुष: उपांत्य फेरी जीएसटी कस्टम्स पुणे: 4 (स्टिफन स्वामी 7वे; बी.फेलिक्स 36वे; प्रणव माने 45वे; तालेब शाह 56वे) वि.वि पीसीएमसी अकादमी: 2 (भारत भारद्वाज 30वे; हर्षदीप सिंग 32वे).

क्रीडा प्रबोधिनी: 4(धैर्यशील जाधव 19वे, 44वे; सचिन कोळेकर 21वे; प्रज्वल मोहरकर 46वे) वि.वि. मध्य रेल्वे पुणे: 3 (ए.सद्दाम 3रे, 13वे; विशाल पिल्ले 49वे.).

महिला: क्रीडा प्रबोधिनी: 3 (तनुश्री कडू 3रे; दीक्षा पाटील 51वे; माही चौधरी 53वे ) वि.वि मुंबई रिपब्लिकन: 0.

पीसीएमसी अकादमी: 4 (प्राजक्ता माने 6वे; भावना खाडे 28वे ; शालानी साकुरे 50वे ; सानिका माने 54वे) वि.वि.एक्सलन्स हॉकी अकादमी: 1 (नेहा खैराळे 36वे).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.