Pune : नांदेड सिटी येथील सदनिका धारकांवर केलेली बेकायदा कर आकारणी रद्द करा; माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील नांदेड सिटी येथील (Pune) सदनिका धारकांवर केलेली बेकायदा कर आकारणी रद्द करा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली आहे. नांदेड सिटी मधील एका सदनिकेला लावलेला कर आम्ही अभ्यासासाठी घेतला आणि त्याचे निष्कर्ष जे आले ते मांडले आहेत. प्रचलीत कायदे आणि नियमाच्या आधाराने या सदनिकेची आकारणी कशी होऊ शकेल याची विस्तृत प्रमाणे मांडणी दिली आहे. याची तपासणी करावी व पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागाने ठरविलेल्या कर आकारणीला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी विनंती माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवकांनी केलेले गणित पुढील प्रमाणे –

नांदेड सिटी मधील एका इमारती मधील सदनिकेला 01 जुलै 2021 पासून कर लावला आहे. कायद्याप्रमाणे सदनिका धारकांना आवश्यक नोटीस (special notice) दिली नाही. साधारण 895 चौ फुटाची सदनिका आहे. पुणे महापालिकेने त्यांना वार्षिक tax लावताना 895 चौ फुट सदनिका x 2.36 रु वाजवी भाडे = 2112 रु मासिक भाडे
2112 रु x 12 महिने = 25336 रु वार्षिक भाडे; त्यात पार्किंगचे 100 चौ फुट x 0.74 पैसे प्रमाणे मासिक 74 रु x 12 महिने = 888 रु वार्षिक
25336 रु वार्षिक भाडे – 10% देखभाल दुरुस्तीचे कमी करून = 22811रु + पार्किंगचे 888 रु = 23699 रु वार्षिक कर पात्र रक्कम 23000 रु annual rateable value प्रमाणे त्यावर 25932 रु या सदनिकेची कर आकारणी महापालिकेने केली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे, TPS – 1816 प्र.क्र. 368 (भाग-1) 15/37 (1 कक) (ग) / वियो/नवि-13 दि.08/03/2019 या प्रमाणे कर आकारणी करणे कायद्याने बंधन कारक आहे. उल्लेख केलेल्या शासन निर्णयातील नियम (रूल) 12.8 प्रमाणे या प्रकल्पातील सदनिका धारकांच्या करामध्ये 66% माफी आहे. त्याप्रमाणे 2.36 रु वाजवी भाड्याच्या 33% म्हणजे 0.80 पैसे मासिक वाजवी भाडे झाले.

716 रु मासिक भाडे x 12 महिने = 8592 रु वार्षिक वाजवी भाडे – 10 % देखभाल दुरुस्ती 859 रु = 7732 रु annual rateable value + 100 चौ फुट पार्किंग x 0.74 पैसे प्रमाणे मासिक 74 रु x 12 महिने = 888 रु वार्षिक महाराष्ट्र (Pune) शासनाच्या आदेशा प्रमाणे घर मालकास करपात्र (annual rateable value) रकमेत मध्ये 40 % वार्षिक सूट दिल्यामुळे वार्षिक करपात्र रक्कम 51171 रु त्यावर महानगरपालिकेच्या मान्य दराने येणारा कर हा 5681 रु MMC act कलम 129 A (2) टेबल प्रमाणे पुणे शहरात नव्याने समाविष्ट गावातील सदनिकांना प्रथम वर्षाला २० % सवलत सर्व साधारण करात असते, त्याप्रमाणे नांदेड सिटी मधील 895 चौ फुट सदनिका धारकांना पहिल्या वर्षी 1135 रु कर यायला पाहिजे.

हे एका बिलाचे उदाहरण आहे, म्हणजे हे बिल 25,932 रु आहे नियम प्रमाणे ते बिल 1135 रु येणे गरजेचे होते 24,897 रु बिल वाढले आहे अशा 120000 बिलांचा विचार केला तर 29,87,64,000 रु इतकी चुकीची थकबाकी दिसणार आहे ती वास्तवात 1,36,20,000 इतकीच पाहिजे, 28,51,44,000 रु इतकी जर रक्कम बिला द्वारे निर्माण केली आहे या रकमे मुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे.

आमच्या सारखा लोकांना कायदा कळतो ते या अधिकाऱ्यांना कळत नाही का ? असा सवालही या माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. आपण आपल्या पातळीवर या संपूर्ण विषयाला स्थगिती देऊन हि आकरणी रद्द करावी व नियमा प्रमाणे प्रत्येक सदनिका धारकांना नोटीस देऊन नव्याने नियमा नुसार कर आकारणी करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, प्रधान सचिव नगरविकास २, पुणे महानगरपालिका आयुक्त यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.