Mahavitaran : महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ द्वितीय नांदेड परिमंडलाचे ‘नजरकैद’ प्रथम

एमपीसी न्यूज – महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत (Mahavitaran) पुणे प्रादेशिक विभागातील पुणे परिमंडलाच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाट्यकृतीने द्वितीय क्रमांकाचा तर औरंगाबाद प्रादेशिक विभागातील नांदेड परिमंडलाच्या ‘नजरकैद’ने प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला. कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दि. 10 व 11 रोजी महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागातील ‘सवाल अंधाराचा’ (पुणे परिमंडल), औरंगाबाद – ‘नजरकैद’ (नांदेड परिमंडल), नागपूर – ‘तो परत आलाय’ (चंद्रपूर परिमंडल) व कल्याण – ‘सलवा जुडूम’ (सांघिक कार्यालय, मुंबई) या प्रादेशिक स्तरावरील विजेत्या नाटकांचे सादरीकरण झाले. शनिवारी (दि. ११) थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, चित्रपट अभिनेते ऋषिकेश जोशी यांच्या हस्ते मुख्य अभियंता व नाट्यनिर्माता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता व दिग्दर्शक राजेंद्र पवार यांच्यासह पुणे परिमंडलाच्या रंगकर्मींनी उपविजेत्याचा करंडक स्वीकारला.

Pune Municipal Ward Structure : ‘अशी’ असेल पुणे महापालिका प्रभाग रचना – उज्ज्वल केसकर

या यावेळी प्रमुख पाहुणे (Mahavitaran) म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेच्या वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.