Pune Municipal Ward Structure : ‘अशी’ असेल पुणे महापालिका प्रभाग रचना – उज्ज्वल केसकर

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Ward Structure) संभाव्य प्रभाग रचनेची लोकसंख्येनुसार विधानसभा मतदारसंघ निहाय विभागणी मार्गदर्शक सूचनाप्रमाणे होऊ शकेल याचा विचार करावा, असे पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्जवल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी म्हटले आहे. आयुक्तांना यासंदर्भातील प्रस्ताव देण्यात आला आहे.

मुळा आणि मुठा नदीवर मनपा नवीन हद्दीसह 6,41,016 लोकसंख्येनुसार यामध्ये वडगाव शेरी आणि शिरूर विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. यात 10 प्रभाग 3 सदस्यांचे झाले होते. आता 4 सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये एकूण 7 प्रभाग होतील. मुळा नदीच्या खाली आणि मुठा नदीवर उत्तर पश्चिम दिशेस नवीन हद्दीसह 9,01,033 लोकसंख्येनुसार शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, मुळशी-भोर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यात 14 प्रभाग 3 सदस्यांचे होते. आता 4 सदस्यांचे 10 प्रभाग होतील.

Chimbli : चिंबळी येथे कंपनीच्या गोडाऊनमध्ये पावणे तीन लाखांची चोरी

मुठा व मुळा नदी खाली नवीन हद्दीसह दक्षिण-पूर्व दिशेस 20,91,385 लोकसंख्येनुसार (Pune Municipal Ward Structure) यामध्ये कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर, पर्वती, खडकवासला आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा भाग येतो. यामध्ये 3 सदस्यांचे 33 प्रभाग होत होते. आता सर्वाधिक 25 प्रभाग 4 सदस्यीय संख्येचे होऊ शकतील. या संपूर्ण रचनेमध्ये 40 प्रभाग हे 4 सदस्यांचे होणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेवटचा प्रभाग किंवा भौगोलिक दृष्ट्या ज्या ठिकाणी अडचण असेल, अशा ठिकाणी 2 प्रभाग हे 3 सदस्यीय होऊ शकतात.

आम्ही त्यावर काम सुरू केले आहे अशी प्राथमिक माहिती जमा करताना वरील वस्तुस्थिती लक्षात आली; म्हणून राज्य सरकारच्या वतीने आपण प्रभाग रचना करणार आहात, म्हणून आपल्याला हि रचना पाठवली आहे, असे उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.