Chimbli : चिंबळी येथे कंपनीच्या गोडाऊनमध्ये पावणे तीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनचे (Chimbli) लॉक तोडून चोरट्यांनी दोन लाख 70 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 7) खेड तालुक्यातील चिंबळी येथे युनियन ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडली.

विनोदकुमार अमरसिंग पुनिया (वय 38, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bike Rider : जवानांना मानवंदना देण्यासाठी 5 पाच बाईक रायडर करणार साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिंबळी येथे (Chimbli) युनियन ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या कंपनीचे गोडाऊन आहे. अज्ञात चोरट्याने गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडाऊन मधून दोन लाख 70 हजार रुपये किंमतीचे कॉपर बॉक्स असलेले तीन वुडन पॅलेट चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.