Swarget Police Action : मालकाच्या घरी चोरी करणाऱ्या नोकराला व त्याच्या साथीदारांना अटक

एमपीसी न्यूज – मालकाच्या घरी सुमारे (Swarget Police Action) पावणे तेवीस लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला व त्याच्या साथीदारांना खंडणी विरोधी पथक एक यांनी अटक केली आहे.

सारिका आप्पासाहेब सावंत (रा. हडपसर), भावना रविंद्र कोद्रे (रा.मुंढवा), जनार्दन नारायण कांबळे (रा. सांगली), ऋषिकेश राजाराम तोरवे (रा.सांगली), दुर्गाचरण रविंद्र कोद्रे (रा. हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात 29 ऑक्टोबर रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. ज्यामध्ये घऱातील सोने, चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीला गेले होते. ज्याचा संशय घरातील नोकर चंदु बालाजी मेडेंवाढ याच्यावर होता.

Bike Rider : जवानांना मानवंदना देण्यासाठी 5 पाच बाईक रायडर करणार साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास

तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी (Swarget Police Action) त्यांनी दागिने सोनार नामे प्रवीण पोपट दबडे, प्रितम पोपट दबडे व त्याचा साथीदार महेश महादेव भोसले (सर्व रा. ढालगाव) यांना विकल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी सोनारालाही अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.