Bike Rider : जवानांना मानवंदना देण्यासाठी 5 पाच बाईक रायडर करणार साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास

एमपीसी न्यूज – भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त (Bike Rider) वाकडमधील पाच बाईक रायडर तरूणांनी देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना मानवंदना देण्यासाठी पुणे ते अरुणाचल प्रदेशमधील काहो ते परत पुणे असा साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. या पाचही तरुणांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सुरक्षित प्रवासासाठी आज (शनिवारी) शुभेच्छा दिल्या. देशभावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिमा राबवाव्यात, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.

देशभरात भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त वाकडमधील पाच बाईक रायडर तरुणांनी एकत्र येत देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. हे पाचही बाईक रायडर तरुण पुणे ते गुजरातमधील नारायण सरोवर पुढे अरूणाचल प्रदेशमधील काहो ते पुन्हा पुणे असा तब्बल 8 हजार 500 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या प्रवासाला त्यांनी आजपासून (शनिवार) सुरूवात केली आहे.

वैभव रहाटे, राहुल मोकाशी, संदीप कटके, राहुल हंकारे, महेंद्र शेवाळे असे त्या पाच बाईक रायडर तरुणांची नावे आहेत. त्यांची ही बाईक राईड इंडिया बुक रेकॉर्डस आणि एशियन रेकॉर्डसमध्ये नोंदवली जाणार आहे. या बाईक राईडला उद्योजक कुणाल मराठे यांनी प्रोत्साहन दिले आहे.

Pimpri Corona Update : शहरात आज 12 नवीन रुग्णांची नोंद; 15 जणांना डिस्चार्ज

या पाचही तरुणांच्या प्रवासाला भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिमा राबवाव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, विनायक गायकवाड, संजय मराठे, साई कोंढरे, संकेत कुटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, याच पाच बाईक (Bike Rider) रायडर तरुणांनी 2019 मध्ये कन्याकुमारी ते लद्दाख ते पुणे असा 8 हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी ‘से नो टू प्लॅस्टिक’ म्हणजेच पर्यावरणाला धोका असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नका, असा संदेश दिला होता. या बाईक रायडची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड अँड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.