Pune Crime News : मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला उस्मानाबाद येथून अटक

एमपीसी न्यूज – मुलीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी (Pune Crime News) उस्मानाबाद येथून अटक केली आहे.

संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळू सितापे (वय 19 रा. आवसा, लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, आरोपी याने पीडित मुलीशी इंन्स्टाग्रामवरून ओळख वाढवली, पीडितेला आरोपीने मेसेजवरून भेटायला बोलावले. तिथे त्याने पीडितेशी जबरदस्ती करत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले, तसेच पीडितेच्या नकळत तिचे अश्लिल फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर व पीडितेच्या काकाच्या व्हॉटसअपवर व्हायरल केले.

Tunisha Sharma : उदयोन्मुख अभिनेत्री तुनिषा शर्माची ‘सेट’वरच आत्महत्या; अभिनेता शिजान खानला अटक

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Pune Crime News) आरोपी विरोधात गुन्हा दाकल करण्यात आला होता. स्वारगेट पोलीस आरोपीचा शोध घेत असताना सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपासाद्वारे  पोलिसांना संजय हा उस्मानाबाद जिल्ह्यातील सुरडी या गावी लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी सुरडी येथे जाऊन त्याला गुरुवारी (दि.22) अटक केले.

ही कारवाई स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, अश्विनी बावचे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस अमंलदार तारू, फिरोज शेख, गायकवाड, चव्हाण, गोडसे, खेंदाड, अनिस शेख, महामुलकर यांनी केली.

गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी आधी पेट्रोल-डिझेलचे दर चेक करा; एका क्लिकवर पाहा तुमच्या शहरांतील किमती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.