Pimpri Chinchwad : बुलेट सायलेन्सरमध्ये दुरुस्ती करून ध्वनी प्रदूषण केल्याने 48.44 लाख रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालयात या वर्षात आतापर्यंत 4,846 बुलेट सायलेन्सरमध्ये दुरुस्ती करून ध्वनी प्रदूषण केल्याने 48.44 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती, आनंद भोईटे (पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड) यांनी दिली आहे.

ही कारवाई 1 जानेवारी ते 27 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तालयातील 13 विभागात करण्यात आली आहे. सांगवी विभागात सर्वाधिक बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात आली व सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. सांगवी विभागात एकूण 1,660 कारवाई करण्यात आली व 16.60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

PCMC News: पाण्याचा ठणठणाट; ‘शटडाऊन’मुळे मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार

तळेगाव विभागात सर्वाधिक कमी बुलेट वाहनांवर (Pimpri Chinchwad) कारवाई करण्यात आली व सर्वात कमी दंड वसूल करण्यात आला आहे. तळेगाव विभागात एकूण 34 बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात आली व 34,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.