Bhor : भोर येथे दुध संस्थांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वाटप

एमपीसी न्यूज – दुध संस्थांना प्रोत्साहनपर (Bhor) अनुदान धनादेश वाटप पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रजच्या माध्यमातून व भोर दूध शीतकरण केंद्राच्या प्रयत्नातून तालुक्यातील तब्बल 20 विविध दूध उत्पादक संस्थांना पशु खाद्य विक्रीसाठी प्रोत्साहन रुपी अनुदान वाटप कार्यक्रम आज भोर येथे संपन्न झाला.

कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांचे हस्ते दूध संस्थांचे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर आणि व्यवस्थापकीय संचालक गनोज लिमये यानी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे यावेळी आश्वासन दिले.

Adv. Yashwant Jamadar Marathi Movie : घटस्फोटाचा गुंता सोडविणारा ‘अँड. यशवंत जमादार’

या कार्यक्रग प्रसंगी, कात्रज संघाचे अध्यक्ष भगवान (Bhor) पासलकर, दूध संघाचे संचालक दिलीपनाना थोपटे, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये, स्व. वि.संघाचे संचालक दिलीप वरे, दूध संकलन अधिकारी सुभाष गोडक, नथुराम दागगुडे, पांडुरंग गोरड, बाळासाहेब जेधे, दीपक कुगकर, एकनाथ शिळीमकर, आबासाहेब जगदाळे, संतोष नांगरे, अशोक कोंढाळकर, बाळासाहेब शिलारे, स्वाती चव्हाण थोपटे, वर्षा महेश मरगजे, कुंडलिक शोपटे, गोहन राऊत, कुमार थोपटे, गणेश चौधरी, अरुण भिलारे यांसह विविध दूध संस्थांचे चेअरमन, प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर दूध शीतकरण केंद्राचे प्रमुख राहुल दिघे यांनी केले तर सूत्रसंचालन गनोज धुमाळ यांनी तर आभार सुभाष गोडक यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.