Adv. Yashwant Jamadar Marathi Movie : घटस्फोटाचा गुंता सोडविणारा ‘अँड. यशवंत जमादार’

समाजातला गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीनं येणार रुपेरी पडद्यावर

एमपीसी न्यूज – कोणतीही गोष्ट तोडणं सोपं असतं पण जोडणं (Adv. Yashwant Jamadar Marathi Movie )अवघड असतं. हेच अवघड वाटणं अगदी सोपं करत नात्यांमधला गुंता वाढविण्याऐवजी तो जर सोडविता आला तर? या प्रश्नाचा शोध घेणारा ‘अँड. यशवंत जमादार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एस. के. प्रॉडक्शन्सची (Eskay Productions) ही निर्मिती( Adv. Yashwant Jamadar Marathi Movie )असून. संजीवकुमार अग्रवाल हे चित्रपटाचे निर्माते असून अनिकेत अग्रवाल आणि चंद्रकांत ठक्कर हे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलं आहे. संजय नवगिरे यांची कथा आणि पटकथा आहे. सिनेमाचे डीओपी आणि संकलक सिद्धेश मोरे आहेत. मंदार चोळकर यांनी सिनेमाची गीतं लिहिली असून अजित परब यांनी संगीत दिलं आहे. अमर लष्कर हे प्रोजेक्ट हेड आहेत. 22 जानेवारी रोजी सिनेमाचा मुहूर्त झाला असून सध्या पिंपरी-चिंचवडजवळ हिंजवडी येथे हॉटेल निराली एक्झिक्युटिव्ह परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

अभिनेता मकरंद देशपांडे, ऋषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली संजीव, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर, प्राजक्ता हनमघर आदी मातब्बर कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहेत.

सिनेमाच्या विषयाची पार्श्वभूमी

आपल्या अवतीभोवती घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. समाजात जितक्या वेगानं लग्नं होतात, तितक्याच किंवा त्यापेक्षाही अधिक वेगानं घटस्फोटाचे निर्णय घेतले जातात. कारण असं की, सध्या करिअरच्या मागे धावत असताना मुलं – मुली विवाह करण्यास उशीर करतात. मात्र, अगदी काहीच दिवसात एकमेकांशी न पटल्यामुळे विभक्त होण्याचा विचार करतात. असे प्रसंग आपण आपल्या समाजात खूप पाहिले असतील. ते वारंवार घडताना दिसतात. माहेरच्या माणसांचा हस्तक्षेप, आर्थिक ताण, सोशल मीडियाचा अति वापर, जोडीदारावर संशय अशी घटस्फोटाची काही ढोबळ कारणं आहेत.

चित्रपटाची कथा

चित्रपट हा समाजाचे प्रतिबिंब दाखवत असतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच आजूबाजूला जे चाललंय ते या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अॅड. यशवंत जमादार हे वकिली क्षेत्रात खूप गाजलेलं नाव आहे. घटस्फोटाची प्रकरणं ते अतिशय यशस्वीरित्या हाताळत असतात. विवाहनंतर एकमेकांच्या सहवासात त्रस्त झालेली जोडपी यांच्याकडे घटस्फोटासाठी जातात आणि प्रत्येक जोडप्याला हमखास विभक्त होण्यासाठी दिसलेला मार्ग म्हणजे अॅड. यशवंत जमादार, हे समीकरणच झालेलं असतं. घटस्फोटाची अनेक प्रकरणं त्यांनी यशस्वीरित्या हाताळलेली आहेत. पण चित्रपटात असं काही घडतं की अॅड. यशवंत जमादार आणि घटस्फोट हे सूत्र पूर्णपणे बदलून जातं.

Chinchwad : अयोध्येतील राममंदिराची संकल्पपूर्ती; काशी, मथुरेतही मंदिर उभारणीचा निर्धार – भैय्याजी जोशी

घटस्फोटासारखा समाजातला गंभीर मुद्दा हा चित्रपटाचा विषय असला तरी कथानक संपूर्णपणे विनोदी अंगानं जाणारं आहे. कारण गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडले की, ते लोकांपर्यंत अधिक सहजपणे रुजतात. कथानकात असलेली सहा जोडपी आणि त्यांचं वागणं, त्यांच्यातले मतभेद यातून प्रसंगानुरुप विनोद घडत जातात.

समाजातील तथाकथित विचारांना चपराक देत, विचारांना भावनिक जोड देत काही ठिकाणी हळवं करणारी कथा आहे. हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीनं कौटुंबिक विषय मांडत असताना सुद्धा कुठेही विषयाचं गांभीर्य कमी होणार नाही, याची दखल घेतली गेली आहे. आपणच आपल्या आयुष्याचं अवघड करून ठेवलेलं गणित सुद्धा सोप्या पद्धतीनं कसं सोडवता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अॅड. यशवंत जमादार हा चित्रपट.

मकरंद देशपांडे म्हणाले, “हल्ली कलाकारासाठी काहीही खासगी राहिलेलं नाही. सोशल मीडियामुळे प्रत्येकजण कलाकार झाला आहे. हे प्रत्येक कलाकाराच्या समोर सर्वात मोठं आव्हान असल्याचे सांगत चित्रपटा विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, एखादी गोष्ट तोडली जाताना जोडली जातेय हे या चित्रपटात पाहायला मिळेल. प्रत्येकाला या चित्रपटातील पात्र आपलीशी वाटणारी आहेत.

अभिनेत्री सायली संजीव म्हणाली, “हा विषय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे आहेत, ज्यांचा अगदी किरकोळ कारणावरून घटस्फोट होत आहेत. आताच्या क्विक जगात हे घडत आहे. हे आव्हान चित्रपटात पाहायला मिळते.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.