Katraj : कात्रज गोळीबारातील दोन्ही आरोपींना अटक, क्रिकेटच्या वादातून केला होता गोळीबार

एमपीसी न्यूज – सध्या पुण्यात दिवसागणीक गोळीबार होत असल्याचे चित्र ( Katraj) आहे. या गोळीबाराची कारणे देखील अगदी किरकोळ आहेत. कात्रज येथे 20 मार्च रोजी झालेल्या गोळीबारातील आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी तपासात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे उघड झाले आहे.

तेजस महादेव खाटपे (वय 23, रा. श्रीराम मंदिराशेजारी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज), तुषार धनराज चव्हाण (वय 24, रा. सच्चाईमाता रस्ता, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Loksabha Election 2024 : शनिवार वाड्यासमोर 3 लाख 80 हजारांची रोकड जप्त

पोलिसांनी दिल्ल्या माहितीनुसार, कात्रज भागात 20 मार्च रोजी क्रिकेट खेळताना तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. आरोपी आकाश पवार, रोहन पवार, तुषार माने, तुषार चव्हाण, दादा चव्हाण, तेजस खाटपे, स्वरुप राठोड, गजानन माने यांनी पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजवली. आरोपी तेजस खाटपे ने ऋषीकेश बर्डे याच्यावर कोयत्याने वार केले. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी तेजस आणि तुषार पसार झाले होते.

पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी कात्रज भागात सापळा लावून पकडले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी पराजे-वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक समीर कदम, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, विक्रम सावंत, राहुल तांबे, आदींनी ही कारवाई ( Katraj) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.