Pune News : गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी ‘आयवा’च्या 55 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (Pune News) तीन दिवसीय 55 वे अखिल भारतीय वार्षिक अधिवेशन 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी (दि. 20 जानेवारी) सकाळी 9.30 वाजता हडपसर येथील मेस्से ग्लोबल (लक्ष्मी लॉन्स) पुणे येथे होणार आहे,” अशी माहिती ‘आयवा’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद कुमार सिन्हा व अधिवेशन संयोजन समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हॉटेल अरोरा टॉवर्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी संयोजन समिती उपाध्यक्ष, ‘आयवा’चे राष्ट्रीय सरसचिव डॉ. दयानंद पानसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व संयोजन समिती सचिव वैशाली आवटे, ‘आयवा’चे व संयोजन समितीचे सचिव के. एन. पाटे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे डॉ. पराग सदगीर, संयोजन समिती सदस्य अनंत नामपूरकर, पराग कश्यप, अनिल कुलकर्णी, शिवराज कुलकर्णी, राजेंद्र आंटद, दिलीप पंडित, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते.

सुभाष भुजबळ म्हणाले, “उद्घाटनावेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे (Pune News) प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषिकेश यशोद आदी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचा समारोप विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 22) दुपारी 4 वाजता होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी विविध चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. अखेरच्या दिवशी 22 जानेवारी रोजी सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुले आहे.”

“यंदाच्या अधिवेशनाची संकल्पना ‘शाश्वत पाणी पुरवठा व सार्वजनिक आरोग्य-सर्वांसाठीची उपलबद्धता’ अशी आहे. देशभरातील तज्ज्ञ तीन दिवस या अधिवेशनात विविध विषयांवर विचारमंथन करतील. पर्यावरण अभ्यासक डॉ. राजेंद्र शेंडे व माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे ‘वातावरणीय बदलांचे पाण्यावर होणारे परिणाम’ यावर व्याख्यान होईल. त्यासह पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल लखनौ येथील इंजि. अनिल कुमार गुप्ता यांना ‘जलनिर्मलता’, ‘सीओईपी’चे डॉ. पराग सदगीर यांना ‘जलसेवा’, तर लखनौ येथील पल्लवी राय यांना युवा महिला अभियंता म्हणून ब्रिजनंदन शर्मा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे,” असेही भुजबळ यांनी नमूद केले.

Pune Railway : पुणे-मिरज रेल्वेच्या दुसऱ्या मार्गिकेचे भूसंपादन पूर्ण

डॉ. दयानंद पानसे म्हणाले, ‘हर घर जल : आव्हाने व उपाय’, ‘चोवीस तास पाणीपुरवठा’, ‘सांडपाणी नियोजन’, ‘मलनिःस्सारण व्यवस्थापन’, ‘जल व मैलापाणी शुद्धीकरण’, ‘यंत्रणांचे संचलन व देखभाल’, ‘जलस्रोतांचे व्यवस्थापन’ अशा विषयांवर विचारमंथन होईल. यासह ‘जलजीवन अभियान’ व ‘अमृत’ ही विशेष सत्रे व युरोप, जपान आणि ब्रिटन येथील तज्ज्ञांचे ‘संशोधन व विकास तंत्रज्ञानाचे आदानप्रदान’वर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, तरुणाईसाठी (Pune News) पाणी क्षेत्राशी निगडित पोस्टर स्पर्धा, तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे शोधनिबंध सादरीकरण होईल.

अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे व तांत्रिक माहिती असलेल्या 142 स्टॉल्सचे प्रदर्शन भरेल. भारतासह परदेशातून 1100 पेक्षा अधिक अभियंता प्रतिनिधी, तर 150 हुन अधिक युवकांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. प्रशासनातील विविध अधिकारी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.