Bhosari : जलतरण तलावातील क्लोरीन गॅस गळती प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bhosari) जलतरण तलावात क्लोरिन गॅस लिकेज झाल्याची घटना मंगळवारी (दि. 10) घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 12) संबंधित एजन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित स्पोर्ट्स अॅंड फिटनेस इक्विपमेंट, चिंचवडचे संबंधित व्यक्ती यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 338, 336, 284, 287 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी ह क्षेत्रीय कार्यालयातील क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी सकाळी कासारवाडी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला. त्यानंतर अनेकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता पाण्यामध्ये क्लोरीन गॅसची गळती झाली असल्याचे समोर आले. जलतरण तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅस वापरला जातो.

त्याच्या सिलेंडरला खालील बाजूला छिद्र पडून गॅसची पाण्यात गळती झाली होती. यामुळे हा प्रकार घडला. या घटनेत अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune : पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा- अजित पवार

घटनेची माहिती मिळतच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह (Bhosari) पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आदि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. सुमित स्पोर्ट्स अॅंड फिटनेस इक्विपमेंट, चिंचवडचे संबंधित व्यक्ती या घटनेसाठी कारणीभूत ठरल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.