Thergaon : सराईत गुन्हेगारांकडून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगारांनी थेरगाव येथे रस्त्याच्या (Thergaon) बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. कोयते हवेत नाचवून परिसरात आरोपींनी दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री साडेअकराच्या सुमारास गणेश नगर येथे घडली.

संदीप प्रभाकर कुलकर्णी (वय 40, रा. गणेशनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (वय 28), असद गोलंदाज (वय 20, दोघे रा, लोकमान्य कॉलनी, थेरगाव), समाधान परिहार (वय 31, रा. लांडेवस्ती, एमआयडीसी भोसरी) यांच्यासह तीन आल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी रात्री घरासमोर शतपावली करीत होते. त्यावेळी दोन अल्पवयीन मुळे तिथे आले. त्यांनी हातातील पालघनने (मोठा कोयता) वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरवण्यास सुरुवात केली.

Bhosari : जलतरण तलावातील क्लोरीन गॅस गळती प्रकरणी गुन्हा दाखल

त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने काही वेळाने आलेल्या सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी (Thergaon) यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

आरोपींनी आरडाओरडा करीत परिसरात दहशत पसरवली. हातातील कोयते हवेत फिरवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने कॉलनीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अवघ्या काही तासात पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

रोहन उर्फ गंग्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी गंग्यावर तडीपारी, स्थानबद्धतेची कारवाई देखील केली आहे.

तसेच, आरोपी असद गोलंदाज आणि समाधान परिहार यांच्यावर (Thergaon) प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा जोरावर आरोपी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.