Bhosari : अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- चिडवल्याच्या रागातून दोघांनी एका बारा वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी सोमवारी (दि.8) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी चंदनीका विलास कांबळे (वय 51, रा.महात्मा फुलेनगर, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धरम सुग्रीव झेंडे व धीरज सुग्रीव झेंडे (दोघे.रा.दापोडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका आठवड्यापूर्वी (दि.4) फिर्यादी यांच्या 12 वर्षीय मुलगा राहत्या घराजवळ खेळत होता. खेळत असताना त्याने आरोपींना चिडवले. याच्या रागातून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. या प्रकरणी त्याच्या आईने सोमवारी फिर्याद दिली असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.