Bhosari : कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनीतील हजारोंचे अॅल्युमिनियम बार चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनीतून 35 हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम बार चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) पहाटे चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी धनंजय रामचंद्र शिराळकर (वय 52, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अॅल्युमिनिअम बारच्या स्टोअरमध्ये नोकरी करतात. शुक्रवारी रात्री कंपनी बंद केल्यानंतर पहाटे साडेतीन ते साडेचारच्या सुमारास चार इसमांनी कंपनीच्या स्टोअरचे तसेच कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनी परिसरात प्रवेश केला.

त्यानंतर 35 हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनिअम बार चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.