Nigadi : क्रेडिट कार्डचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ; माहेरहून पैसे आणण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज – दुस-या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीला मारहाण आणि क्रेडिट कार्डचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करणा-या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संभाजीनगर चिंचवड येथे 2010 ते 15 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडली.

देविदास मारुती मासाळकर (वय 39, रा. संभाजीनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय पत्नीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास याचे दुस-या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे तो फिर्यादी यांना मारहाण आणि शिवीगाळ करीत असे. तसेच दरम्यानच्या कालावधीत आरोपीने क्रेडिट कार्डवर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्याकडे माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली.

फिर्यादी यांनी पैसे आणण्यास नकार दिला असता आरोपीने ‘स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करीन आणि तुम्हाला कामाला लावीन’, अशी धमकी दिली. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.