Domestic Violence: डॉक्टर पत्नीचा छळ प्रकरणी पतीसह चौघावर गुन्हा

एमपीसी न्यूज – डॉक्टर असलेल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी (Domestic Violence) पतीसह सासू, दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम विवाहानंतर सासरचे आपला स्विकार करतील आणि चांगल्या पध्दतीने नांदवतील अशी स्वप्न बाळगलेल्या डॉक्टर महिलेला वेगळेच चित्र पहायला मिळाले. लग्नाच्या 17 वर्षानंतर डॉक्टर असताना पतीसह सासरच्यांचा जातीवाचक छळ सहन करावा लागला.

याप्रकरणी पती महेंद्र सुमंत बडदे (41), सासू उषा सुमंत बडदे (70), दीर संतोष सुमंत बडदे (45) आणि नणंद स्वाती लोणकर यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळ (Domestic Violence), संगणमताने मारहाण, धमकावणे तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2005 त 29 मे 2022 दरम्यान हांडेवाडी रोड हडपसर येथील रूनवाल सिगल व हडपसर येथील मंत्री मार्केट येथील सोसायटीत घडला.

Sex Racket : ‘गे’ म्हणून बदनामीची धमकी देत तरुणांना लुबाडणाऱ्या चौघांना अटक

महेंद्र बडदे यांचा डॉक्टर करूणा यांच्यासोबत 2005 साली प्रेम विवाह झाला. फिर्यादी या अनुसुचित जातीच्या आहेत हे माहिती असतानाही तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तिचा मानसिक छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशयी घेऊन मारहाण (Domestic Violence) केली, तिच्या मैत्रिणी समोर व हॉस्पीटलमध्ये काम करणार्‍या मावशी समोर पती महेंद्र याने फिर्यादीला दारू पिण्यासाठी पैसे मागत जातीवाचक शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.