Bhosari Crime News : बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कुलूप तोडून घरातून (Bhosari Crime News) दोन लाख 58 हजारांचे दागिने चोरीला गेले. ही घटना डूडूळगावामधील रुद्राक्ष सोसायटी मध्ये 2 ते 6 मार्च या कालावधीत घडली.

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार- सुप्रिया सुळे

 

सोमनाथ अशोक जाधव (वय 21, रा. शास्त्री चौक, भोसरी. मूळ रा.  डूडूळगाव, ता. हवेली) यांनी गुरुवारी (दि. 9) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे  डूडूळगाव येथील घर कुलूप लाऊन बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून दोन लाख 58 हजार (Bhosari Crime News)रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.