Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार- सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज- पुणे शहरात बारामती लोकसभा मतदारसंघातील काही भाग येतो.या भागातील पाणी,रस्ते, कचरा प्रकल्प या कामांना अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर असताना गती देण्याच काम केले होते.मात्र सत्ता गेल्यानंतर या सर्व कामांना स्टे देण्याच काम करण्यात आल आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी महापालिका आयुक्तकडे पाठपुरावा करून होत नाही.आता यापुढे आमची काम न झाल्यास आंदोलन (Pune News )करण्याचा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघा तील प्रश्नां बाबत खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत आज बैठक पार पडली.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित दादा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होते.

 

Pimple Gurav News : “जीवनात जगू आता तुका थोडा थोडा…”   संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त शब्दधनचे कविसंमेलन

 

त्यावेळी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी प्रशासनासोबत बैठक होत होती.त्यामुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती मिळत होती.पण आता ती यंत्रणा जागेवर नसून सर्व यंत्रणा कोलमडली आहे.त्यामुळे आम्हाला दर महिन्याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत बैठकी करीता याव लागत आहे.

 

तसेच नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य नाहीत.त्यामुळे पदाधिकारी आणि नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे.या सर्व घडामोडी घडत असून निवडणुका होतील.याबाबतचे चित्र काही दिसत नाही.तसेच अगोदरच्या पालकमंत्र्याची (अजित पवार) बैठक घेण्याची एक पद्धत होती.त्यामुळे आमची काम होत होती.आता ती यंत्रणा नसल्याने आम्हाला सतत महापालिका आयुक्तांकडे याव लागत आहे.अशा शब्दात भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.