Bhosari : फोर्ब्स मार्शल कंपनीचे चेअरमन असल्याचे सांगत वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज – मी फोर्ब्स मार्शल कंपनीचा चेअरमन नौशाद (Bhosari) फोर्ब्स बोलत असल्याचे सांगत 60 वर्षाच्या वृद्धाची 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 28 एप्रिल 2023 रोजी कासारवाडी येथील फोर्ब्स मार्शल कंपनीत घडला आहे.

याप्रकऱणी नटराज जयराम अय्यर (वय 60 रा.कोंढवा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.16) फिर्याद दिली असून अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल धारकामे व्हाट्सअँप वरून संपर्क साधला. त्यावेळी व्हाट्सअप प्रोफाइलवर त्याने फोर्ब्स मार्शलचे चेअरमन नौशाद फोर्ब्स यांचा फोटो वापरला होता.

Pimpri : ‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. फिर्यादीचा विश्वास संपादन (Bhosari) करत 5 हजार रुपयांचे 8 व्हाऊचर असे एकूण 40 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर [email protected] या मेल आयडीवर पाठविण्यास सांगत फसवणूक केली. यावरून भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.