Bhosari : क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या (Bhosari ) बहाण्याने एक कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 13 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत इंद्रायणी नगर भोसरी येथे घडला.

या प्रकरणी 46 वर्षीय (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटस अप क्रमांक ₊601121145290, ₊917001120699, ₊918305051379, ₊918292308899, ₊628989737330, टेलिग्राम आयडी SCAVS 1966, alyssa 1957, सॅंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मिस अॅना कर्दशियन, आलस्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांना क्रिप्टो करंसीमध्ये ट्रेडिंग केल्यास चांगला फायदा होईल असे आमिष दाखवले. मोठ्या रकमेचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. GEE/CAE या फसव्या क्रिप्टो करंसी ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये गुंतवणूक करण्यास (Bhosari) भाग पाडले.

Talegaon Dabhade : तळेगाव पोलिसांनी पकडला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठा

फिर्यादीकडून तब्बल एक कोटी 27 लाख 29 हजार 700 रुपये घेतले. ते पैसे आरोपींनी स्वतासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.