Maval : पवनानगरमध्ये आढळला नऊ फुटांचा अजगर

एमपीसी न्यूज – पवनानगर येथे नऊ फुटांचा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ (Maval) संस्थेच्या सदस्यांनी त्याला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.

Talegaon Dabhade : तळेगाव पोलिसांनी पकडला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठा

सोमवारी (दि. 28) पवनानगर येथे शिवाजी राजीवडे आणि त्यांचे सहकारी जनावरांसाठी गवत कापत होते. त्यावेळी त्यांना शेतात एक मोठा अजगर दिसला. त्यांनी काशिनाथ डोंगरे आणि संतोष घरदाळे यांना सांगितले. त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या शत्रुघ्न रासनकर व रमेश कुमार यांना माहिती दिली. त्यानुसार वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य पवनानगर येथे पोहोचले.

गाईच्या गोठ्याजवळ असलेल्या अजगराला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्याचे ठरले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती देऊन अजगराला पकडले. सुमारे नऊ फूट लांबीचा नर जातीचा अजगर पकडण्यात आला.

वनसेवक गफुर शेख, ईरफान शेख, शभीर शेख, विशाल सुतार, वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, प्रमोद ओव्हाळ, शत्रूध्ना रासनकर, रमेश कुमार, संतोष दहीभाते, सोमनाथ चौधरी, उमेश साळवे, विनोद मोरे, नागेश कदम, नयन कदम, सुरज शिंदे, रोहन ओव्हाळ यांनी अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.