Maval : लोणावळा शहरात शरद पवार यांचा 7 मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा

अजित पवार गटातील नाराज पदाधिकारी वाजवणार तुतारी

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाने ( Maval ) अचानक लोणावळा युवक अध्यक्ष पद बदलले. यामुळे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यातूनच तब्बल 137 जणांनी सामूहिक राजीनामे दिले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नाराजीची दखल घेतली आहे. शरद पवार गुरुवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता हॉटेल कुमार रिसॉर्ट येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार आहेत. त्यामुळे लोणावळा शहर परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते घड्याळ काढून, तुतारी वाजवणार आहेत.

शरद पवार हे लोणावळा व मावळातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार असल्याची माहिती यशवंत पायगुडे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, विनोद होगले, संतोष कचरे, फिरोज शेख व सहकारी यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 4) सकाळी दहा वाजता शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

Akurdi : कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजितदादा पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे मावळातील राष्ट्रवादी बहुतांशी अजित पवार यांच्या सोबत राहिली होती. मोजकेच पदाधिकारी शरद पवार गटात गेले होते.

लोणावळ्यात मात्र मागील आठवड्यात कोणालाही विश्वासात न घेता अचानक युवक अध्यक्ष पद बदलले गेल्याने पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्यात नाराजी पसरली व तब्बल 137 जणांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे दिले होते. याची दखल शरद पवार यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मावळातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी येत्या 7 मार्च रोजी लोणावळ्यात कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला ( Maval ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.