Maval : शासनाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी शुभांगी दळवी यांची निवड

एमपीसी न्यूज – कामशेत येथील श्रीहरी हायटेक नर्सरीच्या (Maval) संचालक शुभांगी पांडुरंग दळवी यांची महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुण्याचे विभागीय कृषि सहसंचालक आर. एस. नाईकवाडी यांनी त्यांच्या प्रकल्पास भेट देत शुभांगी दळवी यांचे अभिनंदन केले. शेतकरी शुभांगी यांनी जिद्दीने केलेली आधुनिक शेती आणि जाहीर करण्यात आलेला पुरस्कार हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले.

कृषि मंत्रालय विभागाचे उप सचिव एस. बी. कराड यांनी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषि पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली. त्यात हा सन 2022 चा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या महिला शेतकरी शुभांगी दळवी या पुणे जिल्ह्यातील एकमेव पुरस्कार्थी आहेत.

Maval : लोणावळा शहरात शरद पवार यांचा 7 मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा

शुभांगी यांचे वडील शहाजी मराठे, आई जयमाला मराठे यांनी तिला पारंपरिक शेतीचे धडे दिले. राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, हॉर्टीकल्चर विज्ञान-तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम, परदेशातील शेतीपध्दत जाणून घेण्यासाठी केलेला तैवान, अरब अमिराती, नायझेरिया आदी देशांचे अभ्यासदौरे केले. श्रीहरी पॉलीहाऊस नर्सरी स्थापन करू स्वतः शेतीत राबताना आदिवासी ठाकर समाजातील महिलांना देखील त्यांनी प्रशिक्षण देत रोजगाराची संधी दिली. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना जिल्हापरिषदेच्या कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुरस्काराबाबत आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या, की  आई वडिलांनी शेतीचे दिलेले संस्कार, पती पांडुरंग दळवी यांनी दिलेली साथ आणि मुलगा श्रीयशने  घरातील माझ्या सांभाळलेल्या जबाबदा-यांमुळे मी घराबाहेर पडून देशविदेशात जाऊन शेती आणि व्यवस्थापनाचे ज्ञान प्राप्त करू शकले. आज आम्ही सारे मिळून शेती करतो. आदिवासींनाही मोफत प्रशिक्षण देत त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून देणारा रोजगार देत असल्याचे मोठे समाधान (Maval) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.