Mp Shrirang Barne : किवळे-विकासनगर भागातील अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दहा कोटींच्या कामांचे भूमीपूजन

एमपीसी न्यूज – महापालिकेचे शेवटचे टोक असलेल्या आणि विकास कामांपासून (Mp Shrirang Barne) काहीसे दूर राहिलेल्या किवळे-विकासनगर भागातील अंतर्गत रस्ते  सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास  आणि नगरविकास विभागाच्या निधीतून दहा कोटी रुपयांच्या  सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमीपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. तसेच विकासनगर येथील मुख्य रस्त्यांची 15 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, सुनिता चंदने, धर्मपाल तंतरपाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किवळे-विकासनगर भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले  होते. त्यामुळे नागरिकांचे हाल होते.

रस्त्यांचा विकास करण्याची अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. नागरिकांचा पाठपुरावा सुरु होता. शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यानुसार नगरविकास विभाग आणि स्थानिक खासदार निधीतून दहा कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला. किवळे भागातील नागरिकांना यामुळे अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.

Maval : शासनाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कारासाठी शुभांगी दळवी यांची निवड

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, खासदार स्थानिक विकास निधी मोठ्या प्रमाणात रस्त्यांसाठी खर्च केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नगरविकास विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला. या निधीतून पिंपरी-चिंचवड शहारातील अंतर्गत रस्त्यांची कामे केली. आवश्यक त्या भागात रस्ते केले. त्यासाठी महापालिकेचेही सहकार्य लाभते. दर्जेदार, वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराल्या दिल्या आहेत. शहरातील विकासावर, चालू असलेल्या विकास कामांच्या दर्जावर माझे बारकाईने लक्ष असते. शहरातील पाणी, रस्ते,  वीज या समस्या मार्गी लावण्याचे काम केले जाते.

किवळे भागातील कमी दाबाने पाणी येण्याची समस्याही मार्गी लावली जाईल. आगामी काळात मुळशी धरणातून अतिरिक्त पाण्याचा साठा शहरासाठी मिळणार आहे. त्यानंतर पाण्याची समस्या उद्भभवणार नाही. विकासनगर येथील मुख्य रस्त्याचे काम करण्याची नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्या कामाची 15 कोटींची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि कामाला सुरुवात होईल, असेही खासदार बारणे (Mp Shrirang Barne)  यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.